‘द केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित चित्रपट टॅक्स फ्री करावा- वसंत लोढा

अलिकडे रिलिज झालेला ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट इतर चित्रपटांना मागे टाकत हाऊसफुल गर्दीत घोडदौड करीत आहे. लोकांच्या मनातील खंत व्यक्त करत या चित्रपटाने सत्य घटनेवर आधारित जे कथानक सादर केले आहे ते लोकांना प्रबोधन करणारे तर आहेच, पण ’लव जिहाद’ च्या माध्यमातून गैर मुस्लिम विशेषत: हिंदू स्त्रीयांची जी विटंबना केली जाते. ती सत्यता या चित्रपटाने स्पष्ट केली आहे.

     प्रत्येक भारतीयांनी हा चित्रपट थिअटरमध्ये जावून मोठ्या पडद्यावर पहावा, यासाठी शासनाने हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करावा, अशी मागणी पंडित दीनदयाळ परिवार संस्थेचे प्रवर्तक वसंत लोढा यांनी केली आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन श्री.लोढा यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष यांना पाठविले आहे.

     या निवेदनावर पंडित दीनदयाळ परिवारचे अध्यक्ष धनंजय तागडे,  सचिव बाळासाहेब भुजबळ, प्राचार्य सुनिल पंडित, बाळासाहेब खताडे, उमेश बोरा आदिंच्या सह्या आहेत.

     देशातील काही राज्यात हा चित्रपट टॅक्स फ्री असून, महाराष्ट्र शासनाने हा चित्रपट टॅक्स फ्री करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हा चित्रपट तरुण मुला-मुलींनी व त्यांच्या माता-पित्यांनी आवश्य पहावा, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.