सिद्धीबाग जलतरण तलावास ‘हिंदू धर्मरक्षक अनिलभैय्या राठोड’ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल प्रताप गडाख मित्र मंडळाच्यावतीने महापौरांचा सत्कार

अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सिद्धीबाग जलतरण तलावास ‘हिंदू धर्म रक्षक अनिलभैय्या राठोड’ यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली याबद्दल त्यांचा शिवसेना उपशहर प्रमुख प्रताप गडाख मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रताप गडाख, ऋषिकेश तळेकर, ऋषिकेश भोसले, रोहित साळूंके, सुशांत कोकाटे, यश सायंबर, सोनु झोडगे, अथर्व झोडगे, अर्पित जयवेरी, विशाल आंबील, केतन बांगर, नंदु म्हेत्रे, अंश रत्नापारखी, ऋशिकेश लष्करे, सिध्दांत बांगर व मित्र मंडळ उपस्थित होते.

     यावेळी प्रताप गडाख म्हणाले, नगर शहराच्या विकासात स्व.अनिलभैय्या राठोड यांनी मोठे योगदान दिले आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच आवाज उठविला. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भुमिका त्यांनी कायम ठेवली होती. कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्याची आठवण कायम स्वरुपी रहावी, यासाठी मनपाच्या सिद्धीबाग जलतरण तलावास त्यांचे नाव देण्यात यावे, अशी अनेकांची मागणी होती, त्यास सकारात्मक प्रतिसाद देत ती पूर्ण केली याचे मोठे समाधान आहे. याबद्दल मित्र मंडळ आपले मन:पुर्वक आभारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     याप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनीही स्व.अनिलभैय्या राठोड यांचे नगरच्या विकासात्मक कार्याचा गौरव करुन मनपा नेहमीच चांगल्या कामे करण्यास प्राधान्य देत राहील, असे ग्वाही दिली.