मनसेच्या वतीने विठ्ठल रखुमाई वेशभूषा स्पर्धा
मनसेचे नितीन भुतारे यांनी सोमवारी दिली माहिती
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहमदनगर यांच्या वतीने, आषाढी एकादशीच्या निमित्ताने लहान मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच धर्माचा प्रसार व्हावा आणि घराघरांत वारीचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता विठ्ठल रखुमाई वेशभुषा स्पर्धा आयोजित केली आहे. आपल्या मुलांची वेशभुषा करून आषाढी एकादशी च्या दिवशी आपल्या घरात लहान मुलांसोबत टाळ, मृदुंगाचा गजर करत मुलांचे फोटो , व्हिडिओ आषाढी एकादशीच्या दिवशी ९८५००५२६८७ या व्हॉट्स ऍप नंबर वर पाठवा.
असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केलंय. स्पर्धेमधील विजेत्याना मनसेच्या वतीने आकर्षक बक्षीसाने गौरवण्यात येईल असे ही भुतारे म्हणालेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे अशी विनंती ही मनसेकडून संकेत होशिंग, संकेत व्यवहारे यांच्या वतीनं करण्यात आलीय. करण्यात आलीय.