मुळा धरणातून आठ हजार क्युसेक पर्यंत वाढवला वेग

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.६० tmc पाणी देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्ह्यातील मुळा धरणातून आतापर्यंत १५१२ दशलक्ष घनफूट नदीपात्रात पाणी सोडले आहे. या धरणातून एकूण २१०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा धरणातून पाण्याचा वेग आता ८००० क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला. नगर नाशिक जिल्ह्यातील धरणातून सोडलेले पाणी आता जायकवाडीत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणात सध्या स्थिती दोन्ही जिल्ह्यातून सुमारे २८,८२६ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. मुळा धरण समूहातून २१००दशलक्ष घनफूट भंडारदरा निळवंडे धरण समूहातून ३३६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुळा धरणातून आतापर्यंत 821 दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रा सोडले. सद्यस्थितीत 8000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून दिवसभरात 711 दशलक्ष घनफूट पाणी नदीत जाणार आहे. मुळा धरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुळा धरणाचे पाणी आता पाचेगावच्या पुढे गेले असून, जायकवाडीत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.