अहमदनगरच्या आय.एस.डी.टी. कॉलेज मध्ये महिला दिन उत्साहात साजरा….

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे: डॉ वैशाली किरण

अहमदनगर : मेट्रो  न्यूज  

अहमदनगरच्या आय. एस. डी. टी. या संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात “संवाद” या उपक्रमाचे उदघाटन डॉ. वैशाली किरण  यांच्या हस्ते करण्यात आले.  संस्थेचे संस्थापक श्री विनायकराव देशमुख हे  प्रमुख अध्यक्ष होते. तर संचालिका पूजा देशमुख, पूजा पतंगे, मेघा आसणे, स्मिता बडाख, पूजा भट,कोमल बिडकर, वैशाली तरडे यांच्यासह विद्यार्थीनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती .

डॉ. वैशाली किरण यांनी संस्थेच्या “संवाद” या उपक्रमाच्या पहिल्या पुष्पात सहभागी होताना मुलींच्या मासिक पाळी, मुली आणि स्त्रियांचे आजार याबाबतच्या प्रश्नांबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.  “महिला आज विविध क्षेत्रात प्रभावीपणे कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर त्या आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्या म्हणल्या.

सर्व आजारांचे मूळ आपला आहार असल्यामुळे आपल्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. प्रामुख्याने आजची तरुण पिढी “जंक फुड” च्या आहारी जाताना दिसते. त्या दृष्टीने मुलींनी विशेष काळजी घ्यावी. मुलींना अन्य जबाबदाऱ्या सोबतच प्रजननाची महत्वाची जबाबदारी देखील पार पाडावयाची असते. त्यामुळे त्यांनी आपला दैनंदिन आहार, योग्य व्यायाम आणि मेडिटेशन यावर विशेष भर द्यावा. असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थीनीना केले.