बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थींच्या कॉपी केसला पर्यवेक्षक शिक्षकाला जबाबदार धरू नये

शिक्षक संघटनेच्या वतीने उर्वरित पेपरचे सुपरव्हिजन व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

अहमदनगर : मेट्रो न्यूज 

     दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरु नये, अशा पध्दतीने कारवाई झाल्यास परीक्षा व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
     शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षण विभागाला या प्रश्‍नाबाबत शुक्रवारी (दि.३ मार्च) भेट देऊन शिक्षण विभागाचे अधीक्षक सत्यजीत मच्छिंद्र यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, खजिनदार बाळासाहेब निवडुंगे, रामदास शिंदे, बद्रीनाथ शिंदे, अमोल ठाणगे, राहुल झावरे, एस.एस. आंधळे, बी.टी. गुंजाळ, एस.पी. चव्हाण, बी.टी. मखरे, संभाजी गाडे, प्रशांत होन, अलीम शेख, ए.जी. कुमावत, एस.एस. वाळके, बी.ती. कांबळे, जी.ए. पोकळे, डी.एन. बोरुडे आदींसह शिक्षक उपस्थित होते.

     पर्यवेक्षण करताना सर्व शिक्षक चोखपणे काम करत असतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॉपी केली तर तो त्याचा दोष आहे, मात्र त्यामध्ये शिक्षकांना जबाबदार धरुन कारवाई झाल्यास अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने उर्वरित पेपरचे सुपरव्हिजन व पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
     बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या कॉपी केसला पर्यवेक्षण करणार्‍या शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करु नये व कमी शिक्षक संख्या असताना परीक्षेसाठी इतर विभागातील कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.