शिवराज्याभिषेक दिनी महाराजांना अभिवादन करून ,वंडर किड्स ने साजरा केला शाळेचा पहिला दिवस

     शाळेचा पहिला दिवस आणि जोडून आलेला शिवराज्याभिषेक दिन हा दुग्ध शर्करा योग्य साधत
शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून वंडर किड्स ने आपल्या शाळेचा पहिला दिवस मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. शाळेत प्रवेश करताना मुले आणि पालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर फुले अर्पण पेरून पूजन केले. आणि मग आपला वर्ग गाठला.
     प्ले ग्रुप च्या मुलासाठी तर खऱ्या अर्थाने शाळेचा पहिलाच दिवस होता. त्यांच्या आयुष्यात हा दिवस प्रथमच आलेला होता. नर्सरी मधील एल के जी आणि यु के जी च्या मुलासाठी हा दिवस त्यांचा आनंद द्विगुणित करणारा होता . सकाळी पालक जेव्हा आपल्या पाल्याला घेऊन जेव्हा शाळेत आले तेव्हा त्यांना शाळेत वेगळाच माहोल दिसला. शाळेच्या प्रवेश द्वारावरच एक उंट उभा होता. मुले त्यावरून सवारी करण्याचा आनंद घेत होते. शाळेच्या आवारात एक विशाल जम्पिंग मिकि माउस वर मुले मनसोक्त उड्या मारत होते. शाळेत प्रवेश करताना प्रवेश द्वारावरच मुलांचे औक्षण करून त्यांना खाऊ वाटण्यात येत होता. सोबत वायरलेस गाडीत बसून मुले रुबाबात गाडी चालवीत होती. शाळेचा पहिला दिवस असल्याने अभ्यास काही नव्हताच. पण शाळेत पालकांना प्ले ग्रुप, एल के जी आणि यु के जी,  च्या मुलांना अभ्यासक्रम काय आहे हे सांगण्यात आले. संपूर्ण वर्षभराच्या अभ्यासक्रमाचे टॉपिक फळ्यावर लिहून ठेवले होते. पालकांनी ते लिहून घेतले.
     सावेडी तील पाईप लाईन रस्त्यावरिल रेणुका माता मंदिराला मागे असलेल्या वंडर किड्स मध्ये हसत खेळत शिक्षण मुलांना दिले जाते. शाळेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या दरवर्षी २०० ते २५० पर्यंत जाते. सावेडी आणि परिसरातील गुणी बालके इथे प्रवेश घेतात. मुलांचे उज्वल भवितव्य होण्यासाठी त्याचा प्राथमिक शिक्षणाचा पायाला पक्का होणे आवश्यक असते त्या दृष्टीने या किड्स मध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल  या कडे लक्ष दिले जाते.
     प्ले ग्रुप च्या मुलांना अभ्याक्रमात खेळ गाणी गप्पा गोष्टी बरोबरच त्यांच्याकडून विविध ऍक्टिव्हिटी करवून घेतल्या जातात. ए ,बी ,सी ,डि, ए -टू – झेड पर्यंत आणि १ ते २० अंकांची ओळख त्यांना शिकवली जाते. फोनेटिक फाईव्ह पिचर बुक, र्ह्यायम्स अँड सॉंग्स या पुस्तका सोबतच त्यांना जनरल नॉलेज, चित्रकला आणि हस्तकला देखील शिकवली जाते.  के जी च्या मुलांना अक्षर आणि शब्द ओळख सोबत  र्ह्यायमिंग, उच्चार शास्त्र आणि स्मार्ट कर्सिव्ह हॅन्ड रायटिंग शिकवून त्यांच्या शालेय गुणवत्तेत कशी वाढ होईल हे प्राधान्याने पहिले जाते .  प्रत्येक महिन्यात मुलासाठी सेंड पिट ऍक्टिव्हिटी, वॉटर प्ले, डायनिंग हॉल, स्पोर्ट्स, क्राफ्ट्स, डान्स आणि योगा असे उपक्रम राबवले जातात. शाळेत सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण असून शाळेचा परिसर सी सी टी व्ही च्या निगराणीत आहे. तसेच मुलांच्या ने न्या आणण्याची व्यवस्था स्कुल व्हेनद्वारे आहे. शाळेच्या गुणवत्ता वाढीकडे संचालिका सौ वैशाली जाधव, प्रिन्सिपल मोनिका दारव्हेकर,  अबोली सातपुते, डॉली सहानी, श्वेता पोखरणा, पद्मा राजू, रुपाली भागवत, सहशिक्षिका माधुरी, रेखा, मीनल आणि मावशी  अख्तर शेख दिया उत्तरकर या लक्ष ठेऊन आहेत. नियमित शाळा दिनांक १२ जून पासून सुरु होणार असून तोपर्यत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे असे वैशाली जाधव सांगितले आहे.