आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा चेअरमनपदी प्रा. पंकज लोखंडे यांची नियुक्ती

मानव अधिकार संघाचे महाराष्ट्र व्हाईस चेअरमन सतीश शेट्टी व कार्याध्यक्ष रवीराज साबळे यांनी लोखंडे यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले.

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा चेअरमनपदी सामाजिक कार्यकर्ते प्रा. पंकज राजेंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली. नवी दिल्ली येथील मानव अधिकार संघाच्या मुख्य कार्यालयातून त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मानव अधिकार संघाचे महाराष्ट्र व्हाईस चेअरमन सतीश शेट्टी व कार्याध्यक्ष रवीराज साबळे यांनी लोखंडे यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले.

 

 

 

भारत सरकार संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या माध्यमातून संपुर्ण देशात नागरिक, महिला, कामगार वर्ग, व्यावसायिक व लहान मुलांच्या न्याय, हक्कासाठी कार्य सुरु आहे. पिडीतांना त्यांचे हक्काची जाणीव करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द आहे. या प्रमुख उद्देशाने संघाचे कार्य सुरु असून, असल्याचे महाराष्ट्र व्हाईस चेअरमन सतीश शेट्टी यांनी स्पष्ट केले.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा.

 

 

प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. तसेच कोरोनाच्या संकटात कामगारांच्या हक्काचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाले. पोलीस यंत्रणा व शासकीय पातळीवर राजकीय दबाव आल्याने पिडीतांना न्याय मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. अशा घटनांना वाचा फोडून आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ पिडीतांना न्याय देण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर संघटन वाढविण्यासाठी जिल्हा, तालुका, शहर, विविध सेलची जंम्बो कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संतोष वाघ, शरद महापुरे, नाना (संदीप) कापडे, सदीप ठोबे, अनिल गायकवाड, जावेद सय्यद, नितिन साठे, विजय दुबे व पोलिस मित्र फोर्स महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल प्रा. लोखंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.