पाच दिवसापासून रांगेत कसोटी ओटीपी येईना वाळूही मिळेना

पाच दिवसापासून रांगेत कसोटी ओटीपी येईना वाळूही मिळेना

राज्य सरकारच्या महसूल विभागाने आणलेल्या नवीन धोरणानुसार मिळणाऱ्या सहाशे रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात सोमवारी मोठी गर्दी पाहायला मिळाली मात्र चार-पाच दिवसापासून रंगीत उभा राहूनही अनेकांची वाळूंसाठी नोंदणी होऊ शकली नाही मोबाईलवर ओटीपी मिळत नसल्यामुळे अनेकांना दिवसभर ताटकळत बसावं लागत आहे मोठी प्रतीक्षा करूनही वाळू मिळत नसल्याने रोज नागरिकांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहे श्रीरामपूर तालुक्यात नव्याने वांगी व एकलहरे येथे शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत महसूल विभागाने नुकतेच या दोन्ही केंद्राचे उद्घाटन केले होते तत्पूर्वी मात्र अनेक दिवसांपासून नागरिकांना वाळू मिळत नव्हती त्यामुळे बांधकामाचे काम ठप्प झाले होते तहसील कार्यालयात वाळूच्या दोन्ही केंद्रावरून बांधकामासाठी वाळूची विक्री सुरू होताच लाभार्थ्यांची मोठी गर्दी उसळली आहे चार दिवसांपासून लोकांची रांग असून अनेकांना माघारी परतावी लागत आहे त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे उक्कलगाव येथील विनायक तांबे यांनी आपण चार दिवसापासून शेतीचे काम सोडून तहसील मध्ये येतो मात्र माघारी जावे लागते असे सांगितले दरम्यान याबाबत तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असतात तो होऊ शकला नाही प्रांत अधिकारी किरण पाटील यांच्याशी संपर्क केला असता हा विषय तहसीलदारांच्या अखत्यारीत येत असल्याचे त्यांनी सांगितले