कापूस सोयाबीन च्या पुढे पेरण्या वाढल्या

राज्यात 68% पेरण्या पूर्ण

राज्यात सध्या सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून राज्यात आत्तापर्यंत 68% अर्थात 96 लाख हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन व कापसाचा पेरा वाढला आहे. सोयाबीन क्षेत्रात 91 टक्के तर कापूस पिकाखालील क्षेत्रात 76 टक्के पेरणी झाली आहे. अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनय आवटे यांनी दिली. सर्वाधिक 87% पेरण्या संभाजीनगर विभागात आहे. राज्यात खरीप पिकाखालील सर्व क्षेत्र एक कोटी 41 लाख 2318 हेक्टर इतका असून आत्तापर्यंत 96 लाख 44 हजार 417 हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 41 लाख 49 हजार 912 हेक्टर असून राज्यात आतापर्यंत 37 लाख 57 हजार 297 हेक्टर वर अर्थात 91 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यात भात रोपांची लावणी करण्याचे कामही सुरू आहे. आत्तापर्यंत एक लाख 54 हजार 158 हेक्टर अर्थात दहा टक्के क्षेत्रावर भाताची लागवड पूर्ण झालेली आहे.