एसटी महामंडळाच्या राज्यातील वेगवेगळ्या आगारातून श्रावणानिमित्त तीर्थक्षेत्राना जाण्यासाठी ‘एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सोमवारपासून म्हणजे आजपासून सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. प्रवाशांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या अंतर्गत प्रत्येक आगारातून श्रावणात एक दिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत असून, सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. अमृत महोत्सवी ज्येष्ठांना मोफत, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तसेच बारा वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.