न्या. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजनासाठी नरेंद्र मोदींची हजेरी

शिवसेनेकडून सडकून टीका

शिवसेनेच्या खटल्याची सुनावणी चालू असून न्या. धनंजय चंद्रचूड हे या खटल्याची सुनावणी करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी हे न्या. चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजनाला गेल्याच्या सोशल मीडियावर आणि वृत्तपत्रामध्ये झळकलेल्या छायाचित्रांमुळे उबाठा तर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्यघटनेचे संरक्षक नेत्यांना भेटतात तेव्हा लोकांच्या मनात शंका उपस्थित होऊ शकते. तसेच आता आम्हालाही न्याय मिळेल का ? याबाबत शंका असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय पीएम मोदी हे दुसऱ्या पक्षाचे आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी संबंधित खटल्यापासून स्वतःला वेगळे करावे. कारण त्यांचे दुसऱ्या पक्षाशी असलेले संबंध सर्वांसमोर आलेले आहेत. असेही स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडले आहे.