स्टिअरिंग वरील ताबा सुटल्यामुळे ऍम्ब्युलन्स उलटली

अपघात टाळण्यासाठी घ्यावी काळजी - कोठारी

जामखेड

परळीला डेड बॉडी सोडून मुंबई कडे निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची जामखेड शहराजवळ नगर रोडवर इंदोर गॅरेजच्या समोर चालकाचा टेअरिंगवरील ताबा सुटल्याने रोड शेजारी असलेल्या चारीमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची पलटी झाली यात एक जण जखमी झाला आहे. जखमीला १०८ रूग्णवाहिकेमध्ये दवाखान्यात हलवले. सुनिल वानखेडे, करण गायकवाड व विजय रेड्डी हे तीन तरूणांनी अ‍ॅम्ब्युलन्स क्रमांक एम एच ४६  बी. एम. ४३०८ मुंबई येथून डेड बॉडी परळी येथे सोडली व परत मुंबईला निघाले होते. जामखेड शहर पास करून नगर रोडवरील इंदोर गॅरेजच्या थोडे पुढे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल चारीमध्ये पलटी झाली. यामध्ये सुनिल वानखडे हे जखमी झाले आहेत.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

 

घटनेची माहिती मिळताच जामखेडचे माजी सरपंच सुनिल कोठारी, जामखेड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण व सुदाम वराट यानी घटनास्थळी धाव घेतली व १०८ अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून जखमीला दवाखान्यात पाठवले. यावेळी जामखेड न्युजशी बोलताना माजी सरपंच सुनिल कोठारी म्हणाले की, अपघात टाळण्यासाठी कोणीही दारूच्या नशेत गाडी चालू नये तसेच झोप आल्यावर आगोदर आराम करावा व नंतर गाडी चालवावी गाडीचा वेग मर्यादित ठेवावा या साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अपघात होणार नाहीत तेव्हा प्रत्येक चालकाने ही काळजी घ्यावी.