प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)
डॉक्टर व पोलीस ह्या दोघांनाही राखी बांधली नाही तरी ते आपले रक्षण करतातच.
डॉक्टर आजारांपासून रक्षण करतात तर पोलीस शत्रूंपासून सदैव आपले संरक्षण करतात…
हेच डॉक्टर व पोलीस मधील ऐक्य लक्षात घेऊन आज स्वराज्य वैद्यकीय संघाने समर्थ पोलीस स्टेशन , पुणे येथे डॉक्टर – पोलीस रक्षाबंधन उत्सव साजरा केला.
टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व समर्थ पोलीस स्टेशन मधील पोलीस बंधू- भगिनी मोठ्या उत्साहात साजरा झाले होते.
मोठ्या आनंदात हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.
पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.