ऍड. अनिता दिघेंचा शिवराष्ट्र सेनेत पक्षप्रवेश

पक्षाध्यक्ष संतोष नवसूपे यांनी दिल्या शुभेच्छा

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

शिवराष्ट्र पक्षामध्ये मनसेच्या रणरागिनी एड.  अनिता दिघे यांचा पक्ष प्रवेश महिला जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच  रजनीकांत आढाव यांची शिव  राष्ट्र पक्षाच्या सचिवपदी निवड करण्यात आलीय.   14 वर्ष अहमदनगर शहरांमध्ये मनसे पक्षाच्या , पक्षस्थपनेपासून  दिघे  यांनी महिला आघाडीचे  शहर जिल्हाध्यक्ष पद भूषविले.  एड. अनिता दिघे यांनी  15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून  साधू मनसे पक्षाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्याकडे पाठवून शिवराष्ट्र पक्षांमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश प्रियंका कॉलनी मधील दिघे यांच्या राहत्या घरी झाला.

 

 

 

यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे.  ओबीसी सेलचे बाबासाहेब करपे,  भिंगार मंडळाचे अध्यक्ष राकेश सारवान,  विनोद साळवे,  सुरज गायकवाड,  किरण पाटकर,  अक्षय ससाने,  महिला आघाडीच्या रत्ना नवसुपे,  वंदना थोरवे,  अश्विनी पाटील,  गायत्री कांबळे,  रेणुका दिघे,  संध्या जोशी आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात  शिव राष्ट्र सेना पक्षाचे नाव मोठे व्हावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे दिघे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राइब करा. 

 

 

 

कोणत्याही प्रकारची राजकीय कारकीर्द नसताना संतोष नवसूपे ज्या प्रकारे सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत लढा देतात. ते कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार दिघे यांनी काढले. पक्षाध्यक्ष संतोष नवसूपे यांनी ऍड. अनिता दिघे यांचे पक्षात स्वागत केले. आणि भावी आयुष्यात त्यांच्या कार्यासाठी  शुभेच्छा दिल्या.