केंद्रीय निबंधकाच्या हलगर्जीपणामुळे नगर अर्बन बँक बंद पडली: अॅड.पिंगळे
खंडपीठात याचिका दाखल; शुक्रवारी सुनावणी
केंद्रीय सहकार निबंधक विजयकुमार यांच्या हलगर्जीपणामुळे नगर अर्बन बँक बंद पडल्याचा दावा नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सदस्य अॅड. अच्युत पिंगळे यांनी केला आहे. या मुद्द्यावर त्यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाद मागितली आहे. न्यायालयाने विजयकुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीत म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याची केवळ न्यायमूर्ती आर. जी. अवचट व संजय देशमुख यांच्यासमोर सुनावणी झाली त्यात ऍड पिंगळे यांच्या वतीने ऍड घोलप यांनी काम पाहिले. अर्बन बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करू नये. अशी नोटीस केंद्रीय सहकार निबंधकांनी पाच वर्षांपूर्वी दिली होती. मात्र त्यावर नंतर काहीच कारवाई केली नसल्याने या विरोधात ॲड. पिंगळे यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याची कदाचित केली होती. त्यावर म्हणणे मांडण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र त्याकडे केंद्रीय सहकार निबंधकांनी दुर्लक्ष केल्याने न्यायालयात अपमान अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने केंद्रीय सहकार निबंधकांना अडीच हजार रुपयांचा दंड करून तातडीने कारवाईचे अध्यक्ष दिले होते. त्यामुळे केंद्रीय सहकार खात्याने बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाचे सदस्यत्व रद्द करण्याचे ठराव बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्याचे आदेश बँक प्रशासनाने दिले होते मात्र पहिल्या कारवाईच्या वेळी हलगर्जीपणा केल्याने व दोषी संचालकांना अपात्र ठरवले नसल्याने हेच दोषी संचालक पुन्हा बँकेच्या निवडणुकीत निवडून आले. त्यामुळे बँकेचे व्यवहार बंद पडल्याचा दावा अॅड. पिंगळे यांनी केला आहे. व जुन्याच याचिकेत त्यांनी हा नवा अर्ज दाखल केला आहे.