बारामतीत नणंद विरुद्ध भावजय? सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देण्याची शक्यता

लोकसभा निवडणूक 2024 साठी आत्तापासूनच सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत दोन गट पडल्याने आता लोकसभा निवडणूकही अटीतटीची होणार आहे. बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना टक्कर देण्यासाठी अजित पवारांकडून मोठी खेळी खेळण्यात येणार आहे. बारामतीत लोकसभेमध्ये नणंद-भावजयीत लढत होण्याची चिन्हे आहेत. बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवारही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आव्हान देणार असल्याची शक्यता आहे. सुळे यांच्या विकास रथाला सुनेत्रा पवार यांनी विकास रथातून उत्तर देणार आहेत, अशा चर्चा रंगत आहेत. सुप्रिया सुळे यांचा विकास रथ आधीपासून मतदारसंघात फिरतोय. त्याचबरोबर आता गेल्या काहि दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचाही विकास रथ बारामती मतदारसंघात फिरताना दिसत आहे. तसंच, पवार यांनी काल दौंडचे आमदार राहुल कुल यांची भेट घेतली होती.