नगरमध्ये रविवारपासून बॅडमिंटनची, अंतर जिल्हा व राज्य अजिंक्य पद स्पर्धा

शहरात ६ जुलै ते 12 जुलै या कालावधीत 17 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि पंधरा वर्षातील मुले व मुलींची आणि सतरा वर्ष आतील मुले व मुलींचे महाराष्ट्र राज्य अजिंक्य पद स्पर्धा होत आहे. संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा होत आहे. वाडिया पार्क क्रीडा संकुलमधील बॅडमिंटन हॉलमध्ये स्पर्धा राहणार आहे. राज्यातून या स्पर्धेसाठी खेळाडू भाग घेणार आहे. या स्पर्धेतून राज्य बॅडमिंटन संघ निवडण्यात येणार आहे.