अवैध सावकारी बाबत जिल्हा उपनिबंधकाकडे आल्या तक्रारीची चौकशी होऊन दोन सावकारांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सहकार अधिकारी शेख अल्ताफ अब्दुलकादर 41 राहणार आलमगिरी भिंगार यांनी फरिया दिली आहे सचिन अजिनाथ ताठे मळा बालिकाश्रम रस्ता सावेडी व दत्तात्रय मच्छिंद्र कसबे राहणार बाभुळगाव तालुका राहुरी अशी गुन्हा दाखल झालेल्या सावकारांची नावे आहेत अल्ताफ गुलाब सय्यद राहणार गांधीनगर बोलेगाव यांनी सचिन ताठे व दत्तात्रय कसबे यांच्या विरोधात अवैध सावकारी बाबत तक्रार केली होती पथकाने 18 मे रोजी सचिन साठे यांच्या घरी झळती घेतली मारुती व्हॅन त्यांच्याकडे मिळून आली पथकाने ती जप्त करून संबंधितास परत दिली सचिन ताठे सय्यद यांना प्रॉमिसरी नोट वर सत्तर हजार रुपये व्याजाने दिलेल्या रकमेची नोंद नोंदवहीत नसल्याचे समोर आली दत्तात्रय कसबे आलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने सय्यद व कसबे यांची आठ जून रोजी सुनावणी घेण्यात आली होती त्यावेळी तक्रारदार सय्यद यांनी केलेल्या तक्रार अर्जातील वाहन माझ्याकडे होते व त्यांनी टाकले पूर्ण नाव माहिती नाही यांना विकल्याची कजबे यांनी कबुली दिली
Next Post