जिल्हाधिकारी कार्यालसमोर आमरण उपोषण
कारवाई झाल्याशिवाय उपोषण संपणार नाही- रावसाहेब शंकर काळे
अहमदनगर (वैष्णवी घोडके)
छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब शंकर काळे हे कामगारांना कामावर घेत नसल्याने आणि त्यांच्या कामाचे वेतन आणि पीएफ चा लाभ देत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आमरण उपोषणाला बसले आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नवनाथ ढाकणे हा ठेकेदार अनेक कामगारांना त्रास देत असून त्यांना वेतन वेळेवर न देता त्यांची अडवणूक करतो. कोरोंना काळात कामगार आपल्या जिवाची पर्वा न करता कंपनीमध्ये काम करत होते. ह्याचा विचार न करता त्यानी अनेक कामगारांना त्यांनी कामावरून काढून टाकले. चार, पाच वर्षांपासून त्यांच्याकडे काम करणार्या कामगारांना १२ तास ड्यूटी करायला लावून त्यांना किमान वेतान आणि पीएफ चा लाभ देखील दिला जात नाहीय. कंपनी व्यवस्थापनसोबत संगनमत करून तो कामगारांची फसवणूक करत आहे.
ज्या कामगारांना कामावरुन काढून टाकले आहे त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे,आणि कंपनी व्यवस्थापन व नवनाथ ढाकणे ची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत ह्या घटनेवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषणावरुण उठणार नाही, असे छावा संघाटेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब शंकर काळे ह्यांनी म्हंटलं आहे.
ह्या वेळी चंद्रकांत विशे, शांताराम गायकवाड, महेश काळे, शाहीर कान्हू सुंबे , मिलिंद कुलकर्णी, धोंडीभाऊ सिंगाड, गवाराम गायकवाड, सुरेश गायकवाड, अचपल खंदारे, अभिमान सदाफुले, अप्पासाहेब अनबोले, मनोज सतेज, महेश गुंजाळ, संतोष देठे, सागर गजघाट उपस्थित होते.