जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात चालू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी केली

राज्यासमोर शहर विकासाचे चित्र उभे करायचे-आ. संग्राम जगताप

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

नगर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळ सर्व चारही रस्त्यांची कामे हाती घेतले असून ती कामे अंतिम टप्प्यात आली आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा रस्ता आहे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती या चारही रस्त्याची कामे मार्गी लागावी यासाठी पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून मोठा निधी उपलब्ध करून घेतला या रस्त्यावर मोठी वाहतूक होत असते जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपल्या कामानिमित्त येत असतात त्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता खराब असल्याने मोठी अडचण निर्माण होत होती.आता या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले लवकरच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

 

 

 

शहर विकासाचे चित्र राज्यासमोर उभे करायचे आहे,नगर शहरातील गावठाण भागातील सर्व रस्ते कॉंक्रिटीकरण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवठा सुरु असून यासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देऊ तसेच अशीच कामे नगर शहरामध्ये सुरू राहतील.कोविड संकट काळातही राज्य सरकार कडून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध केला जात आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून सुरु असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्ता कॉंक्रिटीकरण कामाची पाहणी त्यांनी केली यावेळी समवेत उपमहापौर गणेश भोसले,स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक नज्जू पैलवान,दरबार फाउंडेशनचे अध्यक्ष वाजिद जाहगीरदार,इमरान जाहगीरदार, जावेद सिमला,जहिर शेख,तारिक चामडेवाला,सचिन शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती अविनाश घुले म्हणाले की,जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील चारही रस्त्यांची कामे मार्गी लागणे अत्यंत महत्त्वाचे होते.

 

 

 

 

 

 

आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. या भागात अनेक दिवसांपासून रखडलेला रस्त्यांचे प्रश्न आता मार्गी लागले आहे. यापुढील काळातही आमदार संग्राम जगताप व महापालिकेच्या माध्यमातून शहर विकासाचे प्रश्न सोडवू, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील रस्त्याचे प्रश्न मार्गी लागल्या मुळे या भागाच्या वैभवात भर पडेल असे ते म्हणाले.