मनपासमोर संघटनांची निदर्शने

घरपट्टी तिपटीने वाढवण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलने

अहमदनगर (ऋषिकेश राउत)

नगर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या सभेत मनपा ने घरपट्टी तिपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला पीस फाऊंडेशन, शहर सुधार समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, उर्जिता सोशल फाऊंडेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन या संस्थांनी विरोध केलाय. कुठल्याही परिस्थिती हा विषय मंजूर होऊ नये. कोरोना काळात नागरिकांना भुर्दंड पडू नये. यासाठी या संघटनांनी पालिकेसमोर निदर्शने केली.

 

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा.

 

 

                              महापालिकेत सुविधांच्या नावाने वानवा आहेच, रस्ते नांगरलेले आहेत, पाईपलाईन फुटलेल्या आहेत, पिण्याचे पाणी गढूळ आहे, सांडपाणी फिल्टर न करता थेट सीना  नदी पात्रात सोडले जाते. नियम धाब्यावर बसवून नगरमध्ये सुविधा न देता फक्त मलिदा खाण्याचा प्रकार महापालिका पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी  करतायेत. असा आरोप या आंदोलनाद्वारे करण्यात  आला. या आंदोलनाचे नेतृत्व अर्शद शेख, प्रा. मेहबूब सय्यद , संजय झिंजे, ऍड. सुधीर टोकेकर, अशोक सब्बन, संध्या मेढे, कामगार युनियन चे अध्यक्ष अनंत लोखंडे, बहिरनाथ वाकळे यांनी केले.