प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)
पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके , संचलित शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर, भाळवणी मागील काही महिन्यांपासून कोरोना ग्रस्त रुग्णांसाठी संजीवनी ठरलंय. या कोव्हीड केअर सेंटरमध्ये अनेक रुग्ण आत्तापर्यंत ठणठणीत होऊन घरी गेलेत. इथल्या रुग्णांना उपचारांसोबतच रोज पौष्टिक आहार आणि विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांची मेजवानी मिळतेय.

देशभरात अनोख्या पद्धतीच्या उपचारांसाठी नावाजले

एक “राजकारणातला ढाण्या वाघ” आणि एक “परमार्थातील ढाण्या वाघ” असे दोघेही जिथे जातात तिथे गर्दी होते, मग लोक कोव्हीड सेंटरचा ही विचार करत नाहीत, अशा शब्दात निलेश लंके आणि इंदुरीकर महाराजांचा गौरव करण्यात आला. इंदुरीकर महाराजांचे पाय या कोव्हीड सेंटरला लागले, ह्याशिवाय मोठं भाग्य नाही असे ही प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी कोव्हीड सेंटरच्या रुग्णांव्यतिरिक्त गावकरी ही उपस्थित होते.
