मनपा आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज

आठ लाखांची लाच मागितल्याचे प्रकरण आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बुधवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सनावणी होणार आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आठ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी आयुक्त जावळे व स्वयं सहाय्यक श्रीधर देशपांडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 व 20 जून रोजी लाच मागणी पडताळणी झाल्यावर जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सलग तीन दिवस आपला रचला होता. मात्र ही कारवाई फोल ठरली. लाच मागणी पडताळणी दरम्यान देशपांडे यांनी लाच मागितली व आयुक्त जावळे यांनी त्याला प्रोत्साहन दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्याआधीच दोघे प्रसार झाले आहेत. आता आयुक्त जावळे यांनी ऍड. सतीश भुगळे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेत, गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील फिर्यादीच्या वतीने ऍड. अभिजीत पुप्पाल यांनी वकीलपत्र दाखल केले आहे.