१२०० जणांची तपासणी; नेत्र शिबिर संपन्न

अहमदनगर : शिवसेना नगर शहर आणि योगिराज गाडे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात अकरावे मोफत नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे १ हजार २०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे घेतले. या उपक्रमामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांना नेत्रतपासणीच्या माध्यमातून मदत मिळाली आहे, आणि त्यामुळे आता अधिकाधिक नागरिक सजग होत आहेत. शिवसेना जिल्हा प्रमुख (ठाकरे गट) प्रा. शशिकांत गाडे यांनी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. केडगाव येथील भैरवनाथ मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी प्रा. शशिकांत गाडे., माजी नगरसेवक योगिराज गाडे, दिलीप सातपुते आदी. शिबिरात दिलीप सातपुते, महाराष्ट्र राज्य युवासेना उपसचिव विक्रम राठोड, माजी नगरसेवक अमोल येवले, माजी नगरसेवक संग्राम कोतकर आदी उपस्थित होते. प्रा. गाडे म्हणाले, दृष्टिदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या शिबिराच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत चष्मे आणि नेत्रचिकित्सा मिळाल्याने त्यांच्या जीवनात प्रकाश आला आहे.