वर्दीतला कृतज्ञ विद्यार्थी

पोलीस उप निरीक्षक सतीश शिरसाठ यांना घडविणाऱ्या गुरुजींचा सन्मान

प्रतिनिधी (वैष्णवी घोडके)

 

                            माणूस आपल्या आयुष्यात कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गुरूला कधीही विसरत नाही. विशेषतः शाळेत ज्या गुरुजींनी त्याला शिकवले ते आदर्श शिक्षक कायम त्याच्या मनात घर करून असतात. अशाच एका वर्दीतल्या कृतज्ञ गुणी विद्यार्थ्यांचा प्रत्यय सर्वाना आला.  कोतवाली पोलीस ठाण्याशी अंकित झेंडीगेट पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ आणि आपल्या शालेय जीवनात ज्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले त्या गुरुजींना आपल्या पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचा सत्कार केला. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि शिक्षक दिन साजरा केला. त्यासोबत आपले सामाजिक गुरु म्हणून जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचा सत्कार केला.

 

 

 

 

 

                                     सतीश शिरसाठ हे मूळचे आष्टी तालुक्यातील सारोळा गावचे रहिवासी आपल्या विद्यार्थी दशेत त्यांना इयत्ता ५ वि ते १० दरम्यान जे शिक्षक शिकवायला होते. त्यांचा सत्कार त्यांनी केला.  यासाठी त्यांनी  सुहासभाई मुळे , राम  रावसाहेब कडूस सर , पोपट ज्ञानेश्वर मोरे सर आणि बजरंग एकशिंगे सर यांना आपल्या ड्युटीच्या ठिकाणी झेंडीगेट पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले. आणि त्यांचा यथोचित सत्कार केला.

 

 

 

हे ही पहा आणि सबस्क्राईब करा. 

 

 

 

 

                                आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी , आपल्या अंगात शिस्त सचोटी प्रामाणीक पणा हे गुण अंगीकारावे यासाठी या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यामुळेच मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्यांनी केलेल्या उपकाराची कधीच परतफेड होणार नाही म्हुणुनच शिक्षक दिली आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होतोय असे उदगार त्यांनी काढले. आणि उपस्थित शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांने एम पी एस सी परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षकाची खुर्ची  मिळवली. त्यांचे हे यश पाहून उपस्थित शिक्षक हेलावून गेले .

 

 

 

                           शिक्षा फक्त पैसे देऊन मिळत नाही , ज्ञान हे आपल्या गुरूचा आदर सन्मान करून त्यांच्यावर विश्वास ठेऊन प्राप्त होत असते असे शिरसाठ मानतात त्यामुळे दरवषी ते शिक्षक दिली आपल्या आष्टी तालुक्यातील गंगादेवी विद्यालयाच्या शिक्षकांसमोर नतमस्तक होतात.