बाबा नव्हे, यंत्रणा आणि आयोजकांवर फोडले गेले खापर

90 साक्षीदारांचे जबाब

हाथरसमध्ये दोन जुलै रोजी नारायण साकार हरी भोले बाबांच्या सत्संगात चिंगराचेंगरीत झालेल्या 123 जणांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या मूळ कारणांचा एसआयटीने तपास पूर्ण करून यूपी सरकारला पंधरा पानांचा अहवाल पाठवला आहे. घटनेचे खापर प्रशासन आणि आयोजकांवर फोडण्यात आले आहे. गरज पडल्यास बाबाला तपासात सामावून घेतले जाईल, एवढेच याबाबत सांगण्यात आले आहे. या घटनेतील साक्षीदारांपैकी बाबा आणि आयोजक देवप्रकाश मधुकर यांच्यासह सुमारे 40 लोक एसआयटी समोर हजर झाले नाहीत. सुप्रीम कोर्टाचे वकील ए. पी. सिंग यांनी बाबा आणि मधुकर यांची बाजू मांडली. वकील म्हणाले, मधुकर हा हृदयरोगी असून रुग्णालयात दाखल झाला आहे. या अपघातात त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही मृत्यू झाला. बाबा फरार नाही. तो फक्त यूपीमध्येच असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या सत्संगासाठी प्रशासनाने 50 हजार लोकांचीच परवानगी दिली होती. अहवालात 80 हजार लोक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत दीड लाख तर बारा वाजेपर्यंत अडीच लाख लोक या ठिकाणी आले होते. त्यांना हाताळण्यासाठी केवळ 40 पोलीस यावेळी तैनात होते. इतकी गर्दी असतानाही एकच एसडीएम, दोन निरीक्षक आणि दोन रुग्णवाहिका त्या ठिकाणी तैनात होत्या. घटनास्थळी अग्निशमन दल वैद्यकीय कर्मचारी नव्हते. वाहतुकीचा कोणताही आराखडा तयार नव्हता. महामार्ग जाममुळे पीडितांना रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला.पीएचसीसीएचसी मध्ये पुरेसे डॉक्टर व वैद्यकीय उपकरणे नव्हती. सिकंदरराऊ ट्राॅमा सेंटरमध्ये दोनच ऑक्सिजन सिलेंडर होते, वेळेत उपचार अभावी अनेकांचा मृत्यू झाला. सुमारे साडेतीन तासानंतर केवळ डीएम व एसएसपी घटनास्थळी पोहोचले. संध्याकाळी सहापर्यंत अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता. सत्संगातील भीषण अपघाताची माहिती ही आयोजकांनी जिल्हा प्रशासनाला दिली नाही. या प्रशासनाने बाबांच्या यंत्रणेवर डोळे झाकून विश्वास ठेवला. कोणतेही वरिष्ठ अधिकाऱ्याने कार्यक्रमाला गांभीर्याने घेतले नाही. घटनास्थळावरून एसडीएम सिकंदरराऊ निरीक्षकांनी काहीच माहिती दिली नाही. ज्या शेतात सत्संग झाला तिथे, आधीच पाणी साचले होते. दलदलीच्या जमिनीची पाहणी कोणत्याही अधिकाऱ्याने केले नाही. प्रवेश व निर्गमच्या एकाच रस्त्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही.
सेवेकरी व बाबांच्या आर्मीची मोठी भूमिका पुढे आली आहे जेव्हा महिला चेंगरल्या जात होत्या लोक मदत मागत होते, तेव्हा सेवेकरी म्हणत होते काहीही होणार नाही हरिहर बोला बाबा मदत करतील.परिणामी प्रशासन आणि सेवेकरी यांच्या दुर्लक्ष करण्याच्या भूमिकेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.