हनीट्रॅपचा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

महिलेने साथीदारांसोबत रचला कट

अहमदनगर  

 

 

 

पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून खंडणी वसूल करणारी महिला आणि तिच्या एका  साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्यांना शनिवार २४ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात महिलेला मदत करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला ही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. शीतल खर्डे,आणि गणेश गिर्हे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे  आहेत.

हे ही पहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा 

 

 

हनीट्रॅप ची शिकार झालेल्या शेतकऱ्याने फिर्याद दिल्यानंतर आरोपींचे हे कृत्य समोर आले. फिर्यादी हा पाथर्डी तालुक्यातील रहिवासी आहे. शीतल खर्डे हिने फसवणुकीच्या उद्देशानेच फिर्यादी शेतकऱ्याशी ओळख वाढवली होती.  १५ जून रोजी  सायंकाळी शीतल हिने फिर्यादीला तिच्या घरी बोलवून घेतले. त्याच्याशी जवळीक साधून फोटो काढून घेतले. गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन  त्याच्याकडील पैसे काढून घेतले. अशी फिर्याद फिर्यादीने दिली . त्या नुसार  पोलिसांनी ह्या गुन्हेगारांना पकडले असून पुढील तपास सुरु आहे.