सुभद्रानगर परिसरात वाढतेय नागरिकीकरण

शिवराष्ट्र सेनेचे बुधवारी आयुक्त कार्यालयात आयुक्तांना निवेदन

अहमदनगरमधील स्टेशनरोड  परिसरातील सुभद्रा नगर, दौंड रोड या परिसरात झपाट्याने नागरिकीकरण होत आहे. शहरापासून थोडे बाजूला असल्याने या परिसरात  नागरिक मोठ्या प्रमाणावर घरे बांधून राहायला येत आहेत. ह्या भागात नव्याने वस्ती होत असल्याने परिसरातील नागरिकांना रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधा लवकरात लवकर सुरु व्हाव्यात यासाठी शिवराष्ट्र सेना पक्षाच्या माध्यमातून महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

 

                               या निवेदनात सुभद्रा नगर परिसरातील वाढत्या  नागरिकीकरण च्या दृष्टिकोनातून  या परिसरात मूलभूत सुविधा लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी महापालिका आयुक्तांनी ही ही कामे लवकरात लवकर सुरु करू असे आश्वासन दिले. निवेदनावर सुभद्रनगर परिसरातील राहुल तांबे, संदीप नन्नावरे, आणि अनिल दळवी यांच्या सह्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

                                   राहुल तांबे यांनी यावेळी ड्रेनेज लाईन, पाणी या सुविधा देण्याची मागणी केली .  या प्रसंगी शिव राष्ट्र सेना पक्षाचे पक्षाध्यक्ष  संतोष नवसूपे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, युवासेना प्रमुख शंभू नवसूपे,यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.