अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

कॉलेज रोड परिसरात मृतावस्थेत

अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली.

कॉलेज रोड परिसरात मृतावस्थेत

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन दातीर यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली.

त्याच रात्री अहमदनगरमधील राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

आरटीआयच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघडकीस

दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या.

रोहिदास दातीर यांनी आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र पत्रकाराची हत्या झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.