जिद्दीने मेहनत करा यश नक्कीच मिळेल – ह.भ.प. किशोर महाराज बोर्डे

अहमदनगर : दैनंदिन जीवन व्यतीत करतांना माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे. परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या बरोबर ठेवून जिद्दीने मेहनत करा यश नक्कीच मिळेल असे प्रतिपादन नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील ह.भ.प.किशोर महाराज बोर्डे यांनी श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप.अर्बन क्रेडिट सोसायटी लि.जामखेड शाखेच्या १७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले. बोलतांना पुढे असेही म्हणाले की, जे बोलतो ते शब्द असतात. जे बोलता येत नाही त्या भावना असतात आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही त्या मर्यादा असतात. परिस्थिती कशीही असो, दोन गोष्टी जवळ असल्यावर आपल्याला कोणीच हरवू शकत नाही. एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य! जामखेड शाखेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील नागरिकांसाठी संस्थेने आयोजीत केलेल्या तीर्थप्रसाद व पानसुपारी कार्यक्रमास उपस्थितांना श्री रेणुकामाता प्रतिमा, आरती संग्रह माहिती पुस्तिका व गुलाब पुष्प देवून सन्मानित करण्यात आले. केवळ आपल्या सर्वाच्या सदिच्छा, पाठबळ, आशिर्वाद व सहकार्यानेच जामखेड तालूक्यामध्ये मागील १७ वर्षापासून जामखेड वासियांना अविरत विश्‍वसनीय मूलभूत आर्थिक बँकिंग सेवा देत श्री रेणुकामाता मल्टीस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटरी लिमिटेड, जामखेड शाखा यशस्वीरित्या १७ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याचे शाखेचे एच.ओ.डी.दत्तात्रय अंकम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. शाखेतील कॅशियर प्रज्ञादेवी निकाळजे यांनी ग्राहकांना ठेवींवरील व्याजदर व सुलभ कर्ज सुविधा विषयी माहिती दिली. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले शाखा परिसरातील असंख्य ग्राहकांनी शाखेतील कर्मचार्‍यांचे तत्त्पर सेवेबद्दल कौतुक करून रेणुकामाता संस्थेमधील ठेवींना मिळत असलेल्या सुरक्षितेबद्दल समाधान व्यक्त केले. वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी पासींग ऑफिसर रोहीत घोडके,कॅशिअर प्रज्ञादेवी निकाळजे, क्लार्क बुद्धभूषण पवार व अमोल सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.