कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ
कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ
कोतवाली पोलीस ठाण्यापासून जवळच झाली जबरी चोरी
भर दिवसा भरवस्तीत घरफोडी झाल्याने खळबळ
गुजर गल्लीत आले चोर आणि लुटले लाखो रुपये आणि सोने
चोरट्यांना पोलिसांचं आणि नागरिकांचं भयच नाही का ?
सात लाखांचे दागिने चोरट्यांनी केले ढप
अहमदनगर (प्रतिनिधी) नगरच्या गुजर गल्लीत जबरी चोरी झाली आहे ती देखील भर दुपारी. शुक्रवारच्या दुपारी एक वाजता गुजर गल्लीतल्या अक्कलकोट स्वामी मठाशेजारील धारवेकर वाड्या शेजारी असलेल्या आनंदवन अपार्टमेंट मध्ये चोरटे गुपचूप घुसले त्यांनी दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेचं कुलूप कटावणीने तोडलं आणि घरातली कपाटे फोडून त्यांनी सात लाख रुपयांचे दागिने ढप तर केले आहेत.
भर दुपारी भर वस्तीत ही जबरी चोरी झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा भाग कोतवाली पोलीस ठाण्यापासून अगदी जवळच आहे. त्या ठिकाणी मोठी वर्दळ असते अक्कलकोट स्वामी मंदिरात भाविकांचा वावर असतो.
दुपारी आपली बाहेरची कामे उरकण्यासाठी विशाल गांधी हे घराबाहेर पडले आणि एक ते दोन च्या सुमारास ही चोरी झाली. याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दुपारी झालेल्या चोरीची फिर्याद रात्री बारा वाजता पोलिसांनी लिहून पूर्ण केले आणि ते तपासाला लागले पोलीस तपास चालू आहे असे ते सांगतात. विशाल गांधी यांची पत्नी माहेरी गेली असल्याने ते एकटेच घरी होते.
भर दुपारी चोरी झाल्याने पाळत ठेवून माहितगार माणसानेच ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जातो आहे.