स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार स्व. बन्सीभाऊ म्हस्के यांना मरणोत्तर प्रदान.

शिक्षणमहर्षी मुळे यांचे शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठे योगदान : माजी आ. नंदकुमार झावरे

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

 

                       अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. माधवराव मुळे यांचे शैक्षणिक , सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान मोठे आहे. नगर मधील गोर गरीब कुटुंबातील मुले उच्च शिक्षित व्हावीत यासाठी त्यांनी केलेले कार्य  उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी काढले. स्व. माधवराव मुळे यांच्या ९० व्या जयंती निमित्त स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ऑनलाईन व ऑफ लाईन  आयोजन करण्यात आले होते. हा पुरस्कार स्व. बन्सीभाऊ म्हस्के याना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून झावरे बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष  रामचंद्र दरे ,  संस्थेचे सचिव जी डी खानदेशे , सहसचिव अॅड विश्वासराव आठरे पाटील, संपतराव म्हस्के , न्यू आर्ट्स  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे , बाबासाहेब गुंजाळ उपस्थित होते.

 

 

 

 

                   ते पुढे म्हणाले की, स्व . माधवराव मुळे उर्फ आबा यांनी सर्वच क्षेत्रात मोठे काम केले. राजकारणात आमदारकीची निवडणूक देखील लढवली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विश्वस्त पदाची धुरा त्यांनी अनेकवर्ष चांगल्याप्रकारे सांभाळली. स्व.खा. पदमविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांना नगरमध्ये प्रवेश करण्यासाठी जागा त्यांनी उपलब्ध करून दिली. विखे यांना नगर शहरात इंजिनिअरिंग कॉलेज काढायचे होते . त्यावेळी आबांनी विखे यांना अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डी एड कॉलेजचे वर्ग इंजिनिअरिंग कॉलेज साठी उपलब्ध करून दिले.   नगर शहरातील गोर गरीब मुलांसाठी इंजिनिअरिंग कॉलेज जर सुरु झाले तर त्या मुलांना या शिक्षणासाठी इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही असे आबांना वाटत होते म्हणून त्यांच्याच सहकार्याने हे कॉलेज सुरु होऊ शकले. मुळे यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कामकाज सर्वांच्या सहकार्याने पाहताना संस्थेला मोठे सुवर्णवैभव प्राप्त करून दिले.
                     जी डी खानदेशे म्हणाले की, स्व. माधवरावजी मुळे यांनी समाजासाठी आणि संस्थेसाठी जे काम केले ते अतुलनीय आहे. संस्थेच्या पडत्या काळात त्यांनी काम सुरु केले आणि संस्थेला वैभव प्राप्त करून दिले. संस्थेचे कामकाज पाहताना प्रसंगी त्यांनी आपला आडत व्यवसाय बाजूला ठेवला तो वेळ संस्थेसाठी दिला. त्यांच्यामुळे संस्थेचा खूप फायदा झाला. माझी व त्यांची खूप चांगली मैत्री होती. आमच्या कार्यकाळात आम्ही संस्थेसाठी भरीव असे कार्य करू शकलो याचा मला अभिमान आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                  कार्यक्रमाची सुरुवात स्व. माधवरावजी आबा मुळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश दादा मुळे यांनी केले. स्व. माधवराव मुळे प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मरणोत्तर बन्सीभाऊ म्हस्के यांना करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पश्चात पद्मावती म्हस्के व संपतराव म्हस्के यांनी स्वीकारला. पुरस्कार वितरण सोहळ्यात  अॅड विश्वासराव आठरे  तर  ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी आपले विचार व्यक्त केले. व प्रतिष्ठानचा कामाबद्दल कौतुक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. गणेश भगत यांनी केले. तर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्ता नारळे यांनी शेवटी आभार मानले .    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रतिष्ठानचे सचिव प्रा. एम एम तांबे , खजिनदार बजरंग पाडळकर , प्रा. लालासाहेब हराळ,  डॉ. महेश मुळे , सौ. मीनाताई पोटे , प्रतिष्ठानचे पदाधिकारी , विश्वस्त आणि सभासद  यांनी विशेष परिश्रम घेतले.