शिर्डीमध्ये आज महिला सशक्तिकरण मेळावा होणार संपन्न!

अहमदनगर : शिर्डी येथे शुक्रवारी (२७ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ११ लाख ५२ हजार ४५६ महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून योजनेला गती मिळाली. या योजनेंतर्गत अकोले तालुक्यात ७६ हजार ४७१ महिलांचे अर्ज योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.