जागा 64 अर्ज 6000

पोलीस शिपाई पदासाठी बुधवारी भरती

बुधवारी सकाळी पाच वाजता अहमदनगरच्या सर्जपुर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया होणार आहे. पोलीस शिपाई बँड्समन ही 25 पदरी रिक्त असून, त्यासाठी 1947 उमेदवारांनी अर्ज केला आहे. तर रिक्त 39 चालक पदासाठी 390 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या पदासाठी 19 ते 27 जून या कालावधीत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची प्राथमिक कागदपत्र पडताळणी शारीरिक पात्रता आणि मैदानी चाचणी होणार आहे. पावसामुळे मैदानी चाचणी न झाल्यास उमेदवारांनी पुढील तारीख देण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना वेगवेगळ्या पदांसाठी एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी हजर राहण्याच्या सूचना मिळाल्या त्यांना दुसरी तारीख देण्यात येणार आहे. त्यात मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यात चार दिवसांचा अंतर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी पहिल्या मैदानी चाचणीस हजर असल्याबाबत लेखी पुरावा दुसऱ्या चाचणीच्या वेळी देणे बंधनकारक आहे. उमेदवाराला स्वतः हजर राहून अथवा sp.ahmednagar@gmail.com या ईमेल आयडी वर हा अर्ज करता येणार आहे. काही अडचणी आल्यास उमेदवारांनी नियंत्रण कक्ष अधिकारी यांच्या 0241- 2 41 61 32 या किंवा 91 56 43 80 88 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी केले आहे.