सावेडीत चक्क रिक्षातून अवतरली मिस इंडिया उपविजेती मान्या सिंह

मोरया युवा प्रतिष्ठाण मंडळाच्या गणेश विसर्जन कार्यक्रमास हजेरी

अहमदनगर (संस्कृती रासने )-

प्रबळ इच्छा शक्ती व आत्मविश्‍वाच्या जोरावर उत्तर प्रदेश येथील एक रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेती ठरलेली मान्या सिंह सावेडीत चक्क रिक्षातून अवतरली. मोरया युवा प्रतिष्ठाण मंडळाच्या गणेश विसर्जनाकरिता मान्यासिंह प्रथमच शहरात आल्या होत्या. युवक-युवतींशी संवाद साधून तिने परिस्थितीला दोष न देता, जीवनात मोठी स्वप्न पाहून ती साकारण्याचे आवाहन केले.  कोरोनानंतर बर्याच काळावधीनंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने नगरकर मंत्रमुग्ध झाले.

 

आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अर्जुन मदान, अभिलाषा मदान, मनोज मदान, अपर्णा मदान, अर्चना मदान, जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, प्रदीप पंजाबी, राकेश गुप्ता, प्रितपालसिंह धुप्पड, देवेंद्र मदान, जय रंगलानी, भाऊसाहेब अंबाडे, मोहित पंजाबी, डॉ. व्यवहारे, अनिश आहुजा, विकी अरोरा, प्रशांत मुनोत आदी उपस्थित होते.

 

 

 

 

मान्यासिंह पुढे म्हणाल्या की, जीवनात विजय, पराजय नसतो. ठरवले तर विजय नाहीतर पराजय असतो. आपण जीवन कसे जगतो ? याला महत्त्व असते. प्रत्येकाच्या जीवनात खडतर प्रसंग येत असतात. त्याचा सामना करुन ध्येय गाठण्याची जिद्द प्रत्येकाने अंगी बाळगली पाहिजे. आपल्या जीवनाचे आपण शिक्षक असून, स्वत:ला घडविताना घरातील आई-वडिलांचा सन्मान करण्याचे विचार तिने मांडले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोना नियमांमध्ये शिथिलता आल्याने सर्वांना गणेशोत्सव उत्साहात साजरा करता आला. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यास खंड पडला होता. मान्या सिंह यांचा जीवनप्रवास युवक-युवतींसाठी प्रेरणा देणारा आहे. एक रोल मॉडेल युवकांपुढे आनण्याचे कार्य मोरया युवा प्रतिष्ठाण ने केले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी मोरया युवा प्रतिष्ठाण ने कोरोना काळात वंचित घटकांना आधार देण्याचे कार्य केले. मागील नऊ वर्षापासून प्रतिष्ठाण चे सामाजिक कार्य अविरत सुरु आहे. लंगर सेवेत देखील प्रतिष्ठाण ने योगदान दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

प्रारंभी सेवाप्रीतच्या वतीने घेण्यात आलेल्या अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेतील विजेत्यांची बहारदार नृत्य सादर केले. मान्या सिंह यांचा घर घर लंगर सेवाच्या वतीने हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, राहुल बजाज, कैलाश नवलानी, गोविंद खुराणा यांनी तर सेवाप्रितच्या वतीने अभिलाषा मदान, जागृती ओबेरॉय, डॉ. सिमरनकौर वधवा, अनु थापर तसेच पंजाबी समाज, झुलेलाल मंदिर व राधाकृष्ण मंदिरच्या वतीने सत्कार करण्यात आला. सिंह यांना शहरात आनल्याबद्दल अपर्णा मदान यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. सेवाप्रीतने घेतलेल्या अहमदनगर डान्स आयडॉल व क्यूट बेबी कॉन्टेस्ट स्पर्धेतील विजेत्यांना सिंह यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी मोरया प्रतिष्ठाणचे अभिनव अंबाडे, ललित पोटे, सागर सारडा, निलेश असराणी, गोवर्धन कांडेकर, भूषण फटांगरे, तेजस रासकर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते श्री गणेशाची आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.