पर्यावरण संवर्धनासाठी माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल दिशादर्शक -विलास मुखेकर

माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करंजीच्या टेकडीवर वडाच्या झाडांची लागवड

अहमदनगर (संस्कृती रासने )

-माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करंजी (ता. पाथर्डी) येथील टेकडीवर नियोजित श्री राम मंदिर परिसराच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. टेकडीवर 30 वडाच्या झाडांचे रोपण करण्यात आले.
या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, उद्योजक धिरज मैड, तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुखेकर, जय हिंदचे शिवाजी पालवे, संतोष मगर, संभाजी वांढेकर, प्रदीप टेमकर, जालिंदर आकोलकर, भाऊसाहेब मंचरे, अशोक गरगडे, राजेंद्र अकोलकर, चंद्रकांत अकोलकर, भाऊसाहेब मोरे, वाजिद शेख, करंजी गावचे भजनी मंडळ अध्यक्ष बाबासाहेब आकोलकर, ह.भ.प. वैष्णवी महाराज मुखेकर, मच्छिंद्र अकोलकर, अंबादास आकोलकर, नामदेव मुखेकर, ग्रामसेवक अनिल भाकरे, चंद्रशेखर मोरे, मच्छिंद्र अकोलकर, किसन दानवे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे,    पत्रकार तुळशीदास मुखेकर, सुरज क्षेत्रे आदि उपस्थित होते.

 

 

विलास मुखेकर म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी टाकलेले पाऊल दिशादर्शक आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी माजी सैनिक सरसावले असून, जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ बहरली असल्याचे सांगून, त्यांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्विकारली. उद्योजक धिरज मैड व पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर यांनी माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी वर्षभर सुरु असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. शिवाजी पालवे यांनी आजी-माजी सैनिक व वीर जवानच्या कुटुंबीयांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जय हिंद फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी फाऊंडेशन योगदान देऊन जिल्ह्यातील डोंगर, टेकड्या हिरवाईने फुलविण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती दिली. आभार संतोष मगर यांनी मानले.