सीबीएससी शाळात महागड्या प्रकाशनांच्या पुस्तकातून लूट

सीबीएससी बोर्डाची संलग्न असलेल्या शाळांकडून इतर प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर केला जातो. ही पुस्तके केंद्रीय संस्थेच्या पुस्तकांपेक्षा चार ते पाच पट महागडे आहे. या प्रकारामुळे पालकांची लूट सुरू आहे. ही लूट थांबवण्यासाठी एनसीईआरटीची पुस्तके वापरण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी पालकाने राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रात राज्य बोर्डाचे संलग्न असलेल्या शाळा राज्य शासनाने निश्चित केलेल्या बालभारतीचे पुस्तके वापरली जातात. परंतु सीबीएसई संलग्न शाळा केंद्राच्या एनसीईआरटी या केंद्रीय संस्थेची पुस्तके न वापरता इतर प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर करत असल्याचा आरोप पालक राजू शहा यांनी केला आहे. त्यांनी सरकारकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे की, राज्य संलग्न बोर्डाच्या शाळांमध्ये बालभारतीची पुस्तके वापरली जातात. त्याचप्रमाणे सीबीएससीसाठी केंद्र शासनाचे संस्था असलेल्या एनसीईआरटीच्या प्रकाशन याची पुस्तके वापरणे आवश्यक आहे. परंतु सीबीएससी सलग्न बहुतेक बहुतांश शाळांच्या खाजगी व्यवस्थापकांकडून इतर खाजगी प्रकाशनाच्या पुस्तकांचा वापर केला जातो. ही पुस्तके एनसीईआरटीच्या तुलने चार ते पाच पट महागडे आहेत. त्याचा बोजा पालकांवर पडत असून पालकांची लूट होत आहे. त्यामुळे सीबीएससी शाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पुस्तकांची चौकशी करावी तसेच या शाळांना एनसीईआरटी प्रकाशन याची पुस्तके वापरण्याचे आदेश द्यावे अशी मागणी पालकांकडून होत आहे.