आज 23 लाख नीट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली : नीट युजीशी संबंधित याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. पाच मे रोजी झालेल्या परीक्षेत पेपर फुटीच गैरप्रकार झाला होता. यानंतर फेरपरीक्षा घेण्याच्या याचीका ही दाखल झाल्या. कोर्ट 8 जुलैच्या सुनावणीत म्हणाले होते. नीट युजी परीक्षेचे पावित्र्य भंगले आहे. कोर्टाने एनटीएला शहर केंद्र निहाय निकाल देण्यास सांगितले होते. शनिवारी निकाल जाहीर झाल्यानंतर काही केंद्रांवर निकाल जास्त लागल्याने नवे प्रशासनावर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या सूत्रांनी परीक्षेत गैरप्रकार झाल्याची शक्यता फेटाळली आहे. सूत्र म्हणाले, नीटच्या 23.33 लाख विद्यार्थ्यांपैकी 2321 जणांना सत्तरपेक्षा जास्त गुण मिळाले. ती 276 शहरातील 1404 केंद्रातील आहेत. सिकर, कोटा, यम आदी कोचिंग हबमध्ये 700 पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी जास्त आहे. तथापि लखनऊ, कोलकत्ता, लातूर, नागपूर, फरीदाबाद, नांदेड, कटक, कानपूर, कोल्हापुरातही 700 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काही केंद्रांवर निकाल जास्त लागल्याचा जो नवीन प्रश्न उपस्थित झाला होता. त्याला काही प्रमाणात या ठिकाणी पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.