Police inspector abused.

नगर तालुक्यातील बुऱ्हानगर इथे पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे

नगर तालुक्यातील बुऱ्हानगर इथे पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. तर दुरीकडे डोंगरगण गावात मतदान केंद्रात गर्दी  करणाऱ्या मतदाराना हुसकावून लावण्याचा नादात पोलिसांनी चक्क गावतल्या शाळेच्या मुख्याध्यापाकालाच मारहाण केली . आणि हि मारहाण थेट एम आय डी सी पोलीस ठाण्याचे  सहायक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी या मुख्याध्यापकाला झोडपल्याने गावात काही काळ तणावाचे वातवरण होते . त्यामुळे ग्रामस्थांनी थोडावेळ मतदानावर बहिष्कार टाकला होता . आजारी आईला गाडीतून मतदानासाठी घेऊन येणे पडले महागात
गावातील मते विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय भूतकर हे मतदान केंद्र परिसरात आपली चार चाकी गाडी घेऊन आले होते. भूतकर यांची आई पार्किन्सन रोगाने ग्रस्त असल्याने त्यांनी आपल्या आईला गाडीतून आणले असल्याचा दावा भूतकर यांनी केला होता . मात्र चारचाकी गाडी मतदान कक्षाजवळ गेल्याचे पाहून कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक बोरसे यांचा पारा हलला आणि ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकाला गावातला छपरी गुंड सोडून बेदम मारहाण केली . यावेळी भूतकर यांच्या पत्नींना देखील धक्काबुक्की झाली . यावेळी गावातली पुढारी मंडळी मध्यस्थी करीत होती तेव्हा त्यांना देखील महादेवाचे तीर्थ स्थान  असलेल्या डोंगरगण मध्ये पोलिसांच्या शिव्यांचा प्रसाद खावा लागला . आता या प्रकरणी गाव वरिष्ठ पोलिसाकडे तक्रार करणार आहे.