डॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “ या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. मंगेश वाघमारे यांच्या हस्ते संपन्न.

आठ विद्यार्थ्यांच्या रिसर्च पेपरची निवड करून प्रयास मध्ये ती प्रकाशित

 अहमदनगर (वैष्णवी घोडके)

                             विद्यार्थ्यांच्या संशोधन वृतीला चालना मिळावी या उद्देशाने गेल्या तीन वर्षापासून “प्रयास” या संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन केले जाते. डॉ.भा.पा.हिवाळे संस्था संचलित आय.एम.एस.च्या “प्रयास “या  संशोधन पुस्तिकेचे प्रकाशन न्युंआर्टस कोलेजचे वाणिज्य विभाग प्रमुख व आय.एम.एस.चे माजी विध्यार्थी  डॉ. मंगेश वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक डॉ. एम.बी.मेहता,माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ.उदय नगरकर ,व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.मीरा कुलकर्णी,ग्रंथालय प्रमुख डॉ. स्वाती बार्नबस,डॉ.संजय भक्कड,डॉ.हर्षवर्धन भावसार,डॉ.माधुरी गोडबोले,सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका उपस्थित होते.

 

हे ही पहा आणि सब्सस्क्राइब करा. 

 

 

 

                         आय.एम.एस.च्या विद्यार्थ्यांच्या रिसर्च पेपर मधून विशिष्ठ पद्धतीद्वारे  मूल्यमापन करून आठ विद्यार्थ्यांच्या रिसर्च पेपरची निवड करून प्रयास मध्ये ती प्रकाशित करण्यात आली आहेत. यामध्ये समान माध्यमांचा पर्यटनावर होणारा परिणाम,कोव्हिड काळातील आय .एम. एस.चे विविध उपक्रम व त्यांचा परिणाम,ब्लँक फ्रायडे सेल परिणाम,नगरमधील शूज उत्पादन कंपनी अडचणी व उपाय,डिजिटल मार्केटींगचा नव्याने अभ्यास , स्मार्ट अग्निरोधक यंत्रणा अशा समाज व देश उपयोगी विषयावरील शोध निबंधयात  सादर करण्यात आले आहे.याचा विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक यांना निश्चित फायदा होईल असा विश्वास डॉ. मेहता यांनी व्यक्त केला.

 

 

 

 

                                  माजी विद्यार्थ्याच्या हस्ते प्रकाशन करून संस्थेने केलेला माझा सन्मान माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण असल्याचे सांगत डॉ. मंगेश  वाघमारे यांनी उपस्थित गुरुजनांचे आभार मानले .

या पुस्तकाच्या प्रकाशना करिता डॉ.संजय भक्कड,डॉ.हर्षवर्धन भावसार,डॉ.माधुरी गोडबोले यांनी विशेष परिश्रम घेतले.या सर्वाचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.