राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाहीर निषेध.
मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी ची स्थापना करण्याची मागणी- अथर खान.
अहमदनगर (प्रतिनिधी)- बार्टी, सारथी व महाज्योतीच्या धर्तीवर अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) च्या स्थापनेचा ५०० कोटी रुपयाचा मांडण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळून लावला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर जाहीर निषेध व्यक्त करून महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा मागसलेला आहे हे अनेक समित्याच्या अहवाला वरून सिद्ध झालेले आहे मागासलेला मुस्लिम समाजाच्या मागासले पणा दूर करण्यासाठी व शैक्षणिक विकासासाठी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (मार्टी) ची स्थापन करण्याचा प्रस्ताव केला होता परंतु दुर्दैवाने वित्त विभागाने सदर प्रस्ताव नाकारलेला आहे. तरी ज्याप्रमाणे इतर समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टी, सारथी, महाज्योत अशा संस्था कार्यरत असताना मराठी मुसलमानावर अन्याय का? असे न होता (मार्टी) ची स्थापना करण्यात यावी व त्यास निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष अथर खान समवेत उपाध्यक्ष समीर पठाण, मोसिन पठाण, मुजम्मिल सय्यद, फैयाज तांबोळी, पापामिया पटेल, अल्ताफ शेख, तौफिक पटेल, रफिक शेख, आशिर शेख, सादिक राजे, नूर कुरेशी, मुज्जू सय्यद आधी पदाधिकारी उपस्थित होते.