प्रभाग क्र.8 येथील कल्याण रोड येथील रस्ता काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ
विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या आश्वासनाची पुर्तता
नगर – गेल्या पाच वर्षांत प्रभागातील प्रत्येक भागात विविध विकास कामांच्या माध्यमातून कायम संपर्कात राहून अनेक प्रश्न मार्गी लावले. नागरिकांना सर्व मुलभुत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता केली आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागाव्यात, त्यांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी विविध निधी उपलब्ध करुन देत प्रभागातील विकास कामे मार्गी लावली. महापौर निधी व सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून प्रभागाचा नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला, या प्रभागातील सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न हा काही प्रमाणात मार्गी लावला त्याचे ही समाधान मिळत आहे. पुर्वी या भागात 8 ते 10 दिवस पाणी येत नव्हते. आता तो प्रश्न मागी लागला. प्रत्येक अतंर्गत रस्ताचे काँक्रेटीकरण, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, पाण्याची लाईन आदि मुलभुत सुविधा नागरीकांना आम्ही देवु शकलो, याचे आज आम्हाला समाधान वाटते, त्यासाठी नागरीकांनी सहकार्य केले, असेच सहकार्य नागरीकांनी यापुढील काळातही करत रहावे, असे प्रतिपादन माजी महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्र. 8 मधील माजी नगरसेविका पुष्पाताई बोरुडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातुन कल्याण रोडवरील दिपाली हॉटेल ते विद्या टॉवर्स पर्यंतच्या रस्ता काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या विकास निधीच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी माजी महापौर रोहिणी शेंडगे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संतोष गेनप्पा, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे,संदिप दातरंगे, पारुनाथ ढोकळे, उत्तम राजळे, दिनकर आघाव, प्रसाद गिते, शरद राऊत आदी उपस्थित होते.