महात्मा फुले आरोग्य केंद्रावरील सावळा गोंधळ

लसीकरण केंद्राला टाळे लावणार - भुतारे

अहमदनगर (वैष्णवी घोडके)

केंद्र आणि राज्य सरकारने जनतेच्या सुरक्षिततेसाठी कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राज्य राज्यात राबवायला सुरुवात केलीय. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद अनेक ठिकाणाहून मिळतोय. परंतु नगरमध्ये लसीकरणाचा गोंधळात गोंधळ पाहायला मिळतोय. नगरमधील किंवा राज्यातील एक एकमेव लसीकरण केंद्र आहे कि जिथे इन्चार्ज विना लसीकरण चालते. ऐकल्यास नवल वाटेल ,पण हेच वास्तव आहे. हे एकमेव लसीकरण केंद्र आहे, नगरच्या माळीवाड्यातील महात्मा फुले आरोग्य केंद्र. या केंद्रावर असणारा कर्मचारी  मिसाळ यांनी चे जणू हे केंद्र चालवायला घेतलंय कि काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय.

 

 

हे ही पहा आणि सब्सक्राईब करा. 

 

 

 

मिसाळ हे इथे मनमानी कारभार करतायेत. त्यांना वाटेल त्या व्यक्तीला ते लसीचे टोकन वाटतात. आणि वाटेल त्यांना लसीकरण करतात. या केंद्रावरील आरोग्य कर्मचारी ही मनमौजी आहेत. सकाळी आरामात केंद्रावर आल्यावर ते त्यांच्या इच्छेप्रमाणे लसीकरणाला सुरुवात करतात. ही धक्कादायक बाब समोर आल्यावर शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे आणि मनसे चे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच केंद्रावरील कर्मचारी आणि केंद्राचा स्वयंघोषित इन्चार्ज मिसाळ यांना खरीखोटी सुनावली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी यावेळी लसीकरणासाठी ताटकळत थांबणाऱ्या नागरिकांनी लसीकरणासाठी आयुक्तांच्या घरी जायचे का ? असा सवाल केलाय. या केंद्रावरील हा प्रकार पाहिल्यावर मनसे चे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी या केंद्राला टाळे लावून टाकू असे घोषित केले. इतकं सगळं होऊनही ह्या केंद्रावरील लसीकरण सुरळीत होतेय कि नाही हे पाहायचंय.