“वसुधा इताशा मधील रहिवाश्यांचा सामाजिक उपक्रम ” 

"श्रमदानाने केली आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता "

पुणे :

कोथरूड येथील वसुधा इताशा सहकारी गृह निर्माण संस्थेतील सभासदांनी एकत्र येऊन श्रमदानाने आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता केली.   वसुधा इताशा समोरील रस्त्यावरील  झाडाखाली जमलेला पाला पाचोळा एकत्र जमा केला.  पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या कचरा विभागात कालवून हा पाला पाचोळा उचलण्यास विनंती करण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक पिशव्या,विविध प्रकारच्या बाटल्या,कागद,कापड अश्या प्रकारचा सुखा कचरा ५ गोण्यांमध्ये भरून कचरा घंटा गाडीमध्ये देण्यात आला. 
रस्त्यावरून ,पदपथावरून जाणाऱ्या नागरिकांना नम्र विनंती करण्यात येत आहे कि कृपया हा परिसर कचरा टाकून खराब करू नये. आपला परिसर स्वच्छ असावा ह्या सामाजिक बांधिलकी च्या उद्देश्याने सोसायटी मधील तरुण आणि वरिष्ठ मंडळींनी (महिला आणि पुरुष) या मोहिमेत सहभाग घेतला. 
पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन च्या कचरा विभागास विनंती करण्यात येत आहे की,वेदभवन – वारजे सर्विस रोडवर लोकसंख्या आणि रहदारी वाढत असून ह्या विभागाच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच रस्त्यांवर वाढलेली झाडे आणि फांद्या ट्रिम करण्याची गरज आहे.
कार्यवाह श्री जितेश शेठ आणि कोषाध्यक्ष श्री संजय जोगळेकर यांनी मार्गदर्शन केले आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी या उपक्रमात भाग घेतला आहे.