चोर तो चोर वर शिरजोर.; भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी

अन्यथा १६ सप्टेंबरपासून सहकार आयुक्त कार्यालयइथे बेमुदत उपोषण

अहमदनगर (वैष्णवी घोडके)
                          पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या एका कर्मचाऱ्यावर कर्जत पोलीस स्टेशन मध्ये  ४२० चे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.  या कर्मचाऱ्याने कॅप्टन वराळ यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा  केला. तसेच कॅप्टन  वराळ बँकेची बदनामी करतात असे बिनबुडाचे आरोप केलेत. एका देशभक्तावर असे आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे. आरोप करणाऱ्या या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष, अरुण रोडे हे दिड वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत.

 

 

 

 

हे ही पहा आणि सब्स्क्राईब करा.

 

 

 

 

                                    ३१ डिसेम्बर २०२० रोजी या आरोपीवर कारवाई व्हावी असा ठराव ही मंजूर झाला होता. परंतु सैनिक बँकेचे संचालक मंडळ आणि ह्या कर्मचाऱ्याचे सलोख्याचे संबंध असल्याने ही कारवाई झालेली नाहीय. संजय गांधी निराधार योजनेमध्ये बँकेच्या कर्जत शाखेतील शिपायाच्या नावाने खोटा पासवर्ड तयार करून, या योजनेत महाभ्रष्टाचार झालेला आहे. हा बनावट आयडी पास करण्यासठी बँकेच्या  मुख्य शाखा व्यवथापकाने अधिकाराचा गैरवापर केलाय. याचप्रमाणे बँकेच्या अधिकरी , व्यवस्थापक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून अनेक भ्रष्टाचार केलेत. तरी या भ्रष्टाचाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी , अन्यथा सहकार आयुक्त कार्यालय पुणे, इथे १६ सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा अन्याय निर्मूलन समितीचे अध्यक्ष, अरुण रोडे यांनी दिलाय.