वडाळा परिसरात सर्व अनाधिकृत बस थांबे

परमिट रूम व डान्सबारच्या शेजारीच अनाधिकृत बसथांबा, महामंडळ कारवाई करणार का?

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वडाळा गावाच्या परिसरामध्ये महामार्गावर सर्व अनाधिकृत पणे एसटी बसथांबा हॉटेलच्या मालकाने आपल्या वशिल्याने अधिकाऱ्यांना हाताशी धरून चालू केलेला आहे.     एसटी महामंडळाच्या बसने  प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटी चालक हा नाश्टा व जेवणासाठी या परमिट रुम व डान्सबारच्या शेजारी असणाऱ्या हॉटेलमध्ये घेऊन जातात व त्यांना देखील काही भत्ता व जेवण दिले जाते. एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी नेमलेल्या थांब्यावर अन्न तपासणी, पाणी तपासणी तसेच सर्व काही नियमावलीप्रमाणे तपासणी केलेली असते त्याच वेळी थांबा मंजूर करण्यात येतो. परंतु या थांबयावर एसटी चालक हा प्रवासांना घेऊन थांबत असतो. थांब्यांच्या नियमावलीप्रमाणे या थांब्यांच्या १५० मीटर लगत बियर बार, देशी दारूचे दुकान, परमिट रूम, डान्सबार नसावे असा नियम आहे. परंतु वडाळा गावाच्या लगत महामार्गावर एका हॉटेल शेजारी हाकेच्या अंतरावर परमिट रूम व डान्सबार आहे. याच हॉटेलवर अनाधिकृतपणे बसथांबा सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक माहिती अशी की कुठलाही परवाना या हॉटेल चालकांकडे नसून तरीही एसटी बसेस या ठिकाणी रॉंग साईडने येऊन थांबतात कश्या? या थांबणाऱ्या एसटी बसेसवर कारवाई होणार का असा प्रश्न पडला असून. या थांब्यांच्या शेजारी असणाऱ्या परमिट रूम मध्ये एखाद्या एसटी बसचा ड्रायव्हर मद्यपान करण्यास गेला व त्यानंतर कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहणार. त्यामुळे अशा अनधिकृत एसटी थांबयावर एसटी बस थांबल्यास कारवाई करण्यात यावी.