अहमदनगर मध्ये रंगणार वसंतोत्सव…

लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांचेसह, वैभव जोशी, निखिल फाटक (तबला), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), प्रसाद जोशी (पखवाज), रोहन वणगे (विविध तालवाद्य), आदित्य ओक यांचा सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)

 

              आपल्या चतुरस्त्र गायकीने अभिजात शास्त्रीय संगीत व मराठी संगीत नाटकांना पुनर्जीवित करणारे लोकप्रिय गायक पं.वसंतराव देशपांडे यांच्या जन्म शताब्दी पूर्ती निमित्त अहमदनगर मध्ये शनिवार दिनांक २६ मार्च रोजी सायंकाळी ६.००वा. ‘वसंतोत्सव‘ चे आयोजन करण्यात आलेले आहे. हा महोत्सव “माऊली सभागृह” मध्ये रंगणार आहे. अशी माहिती या महोत्सवाची संयोजन सहाय्यक संस्था सरगमप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.राम शिंदे यांनी दिली.
                ‘वसंतोत्सव’ मध्ये “वसंतराव एक स्मरण” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये वसंतरावांचे नातू व आजच्या पिढीतील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांचेसह, वैभव जोशी, निखिल फाटक (तबला), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), प्रसाद जोशी (पखवाज), रोहन वणगे (विविध तालवाद्य), आदित्य ओक हे सहभागी होणार आहेत.

 

 

 

                प.वसंतराव यांच्या जीवनावर ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून त्या चित्रपटातील काही दृश्ये कार्यक्रमात दाखविण्यात येणार आहेत.
                कोरोनाचे संकट दूर होऊन एका नव्या पर्वाची सुरुवात होत असताना अहमदनगर येथील गानरसिकांना ही एक सुरेल पर्वणीच मिळणार आहे.

 

 

 

सबस्क्राइब करा. 

 

 

                   एम.आय.टि.वर्ल्ड पिस युनिवर्सिटी या कार्यक्रमाचे सहआयोजक आहेत.  लोकमान्य को.ऑप. मल्टीपर्पज सोसायटी लि., विलो पंप, ओर्लिकॉन बाल्झर्स, या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. चंदुकाका सराफ, चिंतामणी आर्ट गॅलरी, चितळे एक्सप्रेस यांचाही सहयोग या कार्यक्रमासाठी लाभला आहे. अशी माहिती संयोजन प्रमुख श्री.राजस उपाध्ये यांनी दिली.
                   सरगमप्रेमी मित्र मंडळ या संस्थेचे विशेष सहकार्य या कार्यक्रमास लाभले आहे. रसिकांनी कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी शहरात आर.बी.कुलकर्णी व मनिष बोरा, सावेडी उपनगरात पवन नाईक व सौ.सई संत, नागापूरसाठी महेश लेले, केडगाव, भिंगार व अन्य परिसरासाठी श्रीमती शिल्पा रसाळ आणि मंडळाच्या कार्यकारी सदस्यांकडे, तसेच अधिक माहितीसाठी 9822075422 , 9403620915 या दूरभाष क्रमांकांवर संपर्क साधावा, असे ही त्यांनी पुढे सांगितले.