किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर भडकले बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला निम्माच भाव
किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर भडकले बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाला निम्माच भाव
बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली वांगी वीस ते 26 रुपयांचा भाव मिळतो भेंडीला 50 ते 70 तर शेवगा 60 ते 70 रुपये दराने सोमवारी विकल्या गेला परंतु शहरी भागात किरकोळ भाजीपाल्याला बाजारात वांगी भेंडी 70 ते 80 रुपये शेवगा 80 ते 100 रुपये दराने विकला जात आहे शेतकऱ्यांच्या शेतमाल अल्प दराने विकल्या जात असला तरी किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांना अधिक दराने खरेदी करावा लागत आहे नगर बाजार समितीत भाजीपाला मार्केटमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत चढ-उतार पाहायला मिळाली सोमवारी आठवड्या भरापूर्वी 35 ते 80 रुपये दराने विकली जाणारी गवार 50 ते 90 शेवग्याला साठ रुपयांचा भाव मिळाला टोमॅटोच्या दरातही घसरण दिसून आली एकीकडे दुष्काळाचे संकट असताना भाजीपाल्याला चांगला दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे परंतु अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळत नाही पण तोच भाजीपाला किरकोळ बाजारात खरेदी करायला गेल्यानंतर सामान्य नागरिकांना 40 ते 50 टक्के जास्त दराने खरेदी करावा लागतो या संपूर्ण प्रक्रियेत शेतकरी भावातील घसरणीमुळे चिंतेत आहे