जायकवाडी वरील सौरऊर्जा प्रकल्पास मच्छीमारांचा विरोध शंकरराव गडाख यांना दिले निवेदन

जायकवाडी वरील सौरऊर्जा प्रकल्पास मच्छीमारांचा विरोध
शंकरराव गडाख यांना दिले निवेदन

नाथसागर जलाशयावरील नियोजित तरंगता सौरऊर्जा प्रकल्प मच्छीमारांच्या उदरनिर्वाह आणि आरोग्यावर दुष्परिणाम करणार आहे. तसेच पशुपक्षी जलचर यांच्या अस्तित्वावर घाला घालणार असल्याने या प्रकल्पास मंजुरी देऊ नये. अशा मागणीचे साकडे आमदार शंकराव गडाख यांच्याकडे समक्ष भेट देऊन निवेदनाद्वारे करण्यात आले. या संदर्भात आमदार गडाख यांना दिलेल्या निवेदनात नाथसागर जलाशय पात्रात पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनी म्हटले आहे. की, नाथसागर जलाशयातील सुमारे 15000 हेक्टर क्षेत्रावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन या शासकीय संस्थेच्या माध्यमातून जियो सर्विसेस मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सी मार्फत सर्वे करण्यात येत आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यास या जलाशयातील मासेमारीवर पूर्णतः बंदी येण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. स्वाभाविकच या प्रकल्पामुळे मासेमारीवर उदरनिर्वाह अवलंबून असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवणार आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रेडीएशन तयार होऊन त्यांचा त्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत दुष्परिणाम होऊन त्यांना दुर्धर आजारांनी ग्रासण्याचा धोका यात विशद करण्यात आला आहे. शिवाय या चला शाळेत वर्षातून चार वेळा प्रजनन क्षमता असलेल्या चिलापी जातीच्या माशांची उत्पत्ती प्रचंड प्रमाणात वाढल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पामुळे मासेमारीवर बंधने, सर्वच जलाचारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उद्भवणार असल्याची बाब यात निदर्शनास आणून देण्यात आली आहे.